'राम आएंगे तो अंगना...' या भजनाची मागील काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या आधी सोशल मीडियावर या भजनावर अनेक व्हिडीओ बनवले जात आहेत.
स्वाति मिश्रा यांनी हे भजन गायलं असून त्या रातोरात प्रसिद्ध झाल्या आहेत.
स्वाति मिश्रा यांनी 3 महिन्यांपूर्वी पोस्ट केलेलं हे भजन सध्या व्हायरल झालं असून पंतप्रधान मोदींनीही या भजनाच्या युट्यूब व्हिडीओची लिंक पोस्ट करत स्वाति यांचं कौतुक केलं.
स्वाति मिश्राच्या या व्हिडीओला 10 हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. युट्यूबवर या व्हिडीओला आता 6.5 कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. मोदींनी व्हिडीओ शेअर केल्याचा फायदा स्वातिला झाला.
स्वाति मिश्रा यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर रिल्स बनवाण्याची आवड आहे.
काही दिवसांपूर्वीच स्वाति मिश्रा यांनी 'ललन टॉप' या वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत स्वत:बद्दलचं एक सिक्रेट सांगितलं.
"एका गाण्याने स्वाति मिश्रा कोट्यधीश झाल्याची चर्चा आहे. खरोखरच तुम्हाला युट्यूबवरुन कोट्यवधींची कमाई झाली आहे का?" असा प्रश्न स्वाति मिश्रा यांना विचारण्यात आला.
स्वाति मिश्रा यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, "मला कोट्यधीश तर बनवलं नाहीये. पण भविष्यात कदाचित मी बनू शकते," असं म्हटलं.
"मात्र मी त्याच्या एक स्टेप खाली आले आहे," असं सूचक विधान स्वाति मिश्रा यांनी केलं. म्हणजे या गाण्यामधून त्या लखपती नक्कीच झाल्या आहेत.
जुलै 2023 मध्ये म्हणजेच 'राम आएंगे तो अंगना...' गाणं प्रदर्शित होणयाआधी स्वाति मिश्रा यांनी एक कार खरेदी केली होती. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेला.