रामायणातील राम जितका चर्चेत आला तितकीच चर्चा सीतेच्या भूमिकेचीही झाली.
आदिपुरुषच्या निमित्तानं एकिकडे अभिनेत्री क्रिती सेनन हिनं साकारलेली सीता मनाचा ठाव घेत असतानाच दुसरीकडे तिच्या आधी ही भूमिका साकारणारे चेहरेही पुन्हा चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री दीपिका चिखलिया हिनं रामानंद सागर यांच्या 1987 मधील रामायण मालिकेमध्ये 'सीता' साकारली होती.
2001 मध्ये बलदेव राज चोप्रा आणि रवि चोप्रा यांच्या 'रामायण' मध्ये सध्याच्या केंद्रीय मंत्री आणि तेव्हाच्या अभिनेत्री स्मृती इराणी यांनी सीता साकारली होती.
2008 मध्ये पुन्हा एकदा सादर करण्यात आलेल्या 'रामायण' या मालिकेमध्ये अभिनेत्री देबिना बॅनर्जीनं सीता साकारली होती.
'देवों के देव... महादेव' या मालिकेमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैकनं सीता साकारली होती. 2011 ते 2014 या वर्षांमध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती.
2012 ते 2013 दरम्यान प्रदर्शित झालेल्या 'रामायण' मालिकेत अभिनेत्री नेहा सरगम हिनं सीतेची भूमिका साकारली होती.
'सिया के राम' या मालिकेमध्ये अभिनेत्री मादिराक्षी मुंडलेनं सीता साकारली होती. 2015- 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं.
शिव्या पठानियानं 'राम सिया के लव कुश' या मालिकेमध्ये सीता साकारली होती.