पूजा भट्ट करायची सलमानचा द्वेष

पूजा भट्ट सध्या बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसत आहे. याचदरम्यान तिची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. त्यावेळी पूजा भट्ट सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या प्रेमात होती.

Shivraj Yadav
Jun 25,2023

1990 मधील गोष्ट

ही 1990 मधील गोष्ट आहे. सोहेल आणि पूजा त्यावेळी नात्यात होते. 1995 मध्ये पूजाने स्टारडम मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत सलमान आणि ती एकमेकांचा द्वेष करायचे अशी कबुली दिली होती.

पूजाने दिली होती सलमानशी वैर असल्याची कबुली

पूजाने सांगितलं होतं की, "मी आणि सलमान आधी एकमेकांचा फार द्वेष करायचो हे मान्य करते. याचं कारण फार विचित्र होतं. आमचं अजिबात जुळत नव्हतं".

पण कारण काय होतं?

"यामुळे आमच्यात एक युद्धच सुरु होतं. मला वाटतं मी लव्ह का दुसरा कोणता तरी चित्रपट करण्यास नकार दिल्यानंतर हे सुरु झालं होतं. पण आता मात्र आमच्यात चांगली गट्टी आहे. आम्ही एक हॅप्पी फॅमिली आहोत".

सोहेलशी नात्याची दिली होती कबुली

या मुलाखतीत पूजा भट्टने सोहेल खानशी असणारं आपलं नातं आणि लग्नासंबंधीही भाष्य केल होतं. आपण सध्या लग्नाचा कोणताही विचार करत नसल्याचं तिने म्हटलं होतं.

सोहेलशी करणार होती लग्न?

तिने सांगितलं होतं की "सोहेल सध्या दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात करत आहे. मला लग्नाची जागा वैगेरे ठरवण्याआधी दोन वर्षं काम कऱण्याची इच्छा आहे".

"आम्हाला एकत्र राहायचं आहे"

"आम्हाला एकत्र भविष्य हवं होतं. आम्हाला एक साधं नात हवं आहे," असं तिने सांगितलं होतं.

पूजा भट्ट बिग बॉसमध्ये

पूजा भट्ट सध्या कंटेस्टंट म्हणून बिग बॉसमध्ये सहभागी झाली आहे. यावेळी तिच्यातील आणि सलमान खानमधील बाँड पाहायला मिळाला.

नेटफ्लिक्सवरील 'बॉम्बे बेगम्स'मध्ये साकारली भूमिका

बिग बॉसमध्ये येण्याआधी पूजा भट्ट 'चुप - रिव्हेंज ऑफ आर्टिस्ट' चित्रपटात दिसली होती. तसंच नेटफ्लिक्सवरील 'बॉम्बे बेगम्स'मध्ये काम केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story