बॉलिवूडमध्ये नाव कमावणं आणि स्वत:चं स्थान निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही. बॉलिवूडच्या टॉप स्टार्समध्ये जागा पटकावण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे यापैकीच यशस्वी अभिनेते आहेत.
बॉलिवूडमध्ये आजच्या घडीचा सर्वात टॉपचा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा समावेश होते. पण शाहरुखचा पहिला पगार होता अवघे 50 रुपये. पंकज उधासच्या एका कॉन्सर्टमध्ये त्याने काम केलं होतं.
महानायक अमिताभ बच्चन कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. पण सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. Shaw & Wallace मध्ये त्यांनी नोकरीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना पहिला पगार मिळाला होता 500 रुपये.
बॉलिवूडमधला मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणजे आमिर खान. एका चित्रपटासाठी आणिर करोडो रुपये चार्ज करतो. पण आमिरचा पहिला पगार 11 हजार रुपये इतका होता. पहिला चित्रपटा कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी त्याने हे मानधन घेतलं होतं.
इंटरनॅशन आयकन प्रियंका चोप्रा श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. मिस वर्ल्ड असलेल्या प्रियंका चोप्राने आपल्या पहिल्या असाईमेंटसाठी पाच हजार रुपये चार्ज केला होता.
बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार चित्रपटांमध्ये एन्ट्री करण्याआधी बँकॉकमध्ये शेफचं काम करायचा. यावेळी त्याला महिन्याला 1500 रुपये मिळत होते.
बॉलिवूडचा भाईजान अर्थन सलमान खानची पहिली कमाई 11 हजार रुपये इतकी होती. पदार्पणातील चित्रपट 'बीवी हो ऐसी' या चित्रपटासाठी त्याला हे मानधन मिळालं होतं.