कुटुंबीयांच्या आठवणीत असणाऱ्या या अभिनेत्रीला पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले.
जान्हवी कपूरनंही श्रीदेवी यांच्यासोबतचा फोटो शेअर करत, आई मी तुला आजही सगळीकडेच शोधत असते असं म्हणत आईच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं.
'तू आम्हाला 5 वर्षांपूर्वी सोडून गेली. तुझ्या जाण्यानंतर प्रेम आणि आठवणी आमच्या सोबतच आहेत...' असं म्हणत त्यांनी शब्दांवाटे भावना व्यक्त केल्या.
श्रीदेवी यांच्या पतीनं म्हणजेच दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर पत्नीच्या आठवणीत एक फोटो शेअर केला.
ही अभिनेत्री जाऊन आता पाच वर्ष पूर्ण झाली. पण, कुटुंबीय मात्र त्यांना विसरु शकलेले नाहीत.
कुटुंबात आनंदाचं वातावरण असतानाच श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
बॉलिवूडची 'मिस हवाहवाई' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त अनेकांच्याच मनाचा चटका लावून गेलं.