बी-टाउनमधील दोन अभिनेत्रींमधील मैत्री आणि त्यांची भांडणं नेहमीच चर्चेत असतात.
कोणे एके काळी कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यात विस्तवही जात नव्हता त्याचे कारण म्हणजे रणबीर कपूर
मात्र, आता या दोघींची मैत्री झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात दीपिकाने कतरिनावर चोरीचा आरोप केला होता.
एका व्हिडिओवरुन दीपिकाने चोरीचा आरोप केला होता. पण दोघींमधील ही भांडणं काही खरी खुरी नसून मस्करीतील होती.
कतरिनाने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती कमी पाण्यात भांडी कशी स्वच्छ करायची हे सांगत होती.
कतरिनाचा हा व्हिडिओ दीपिकाने रीपोस्ट करत कॅटने माझी आयडिया चोरली आहे, असा आरोप केला होता
त्यावर कॅटनेही त्यावर उत्तर देत म्हटलं होतं की, हाहाहा, याचे हक्क मला रुपालीकडून मिळाले आहेत. ती माझी विश्वासी हाउस स्टाफ आहे.
लॉकडाऊनच्या काळात दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक सीरीज सुरू केली होती. त्यात ती घरात तिचा वेळ कसा व्यतित करते हे सांगत होती.