याशिवाय क्रांतिवीर, मैने गांधी को नही मारा, स्प्लिट्सविला, गंदी बाद यासारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.
आदित्य सिंग राजपूत अनेक वर्ष टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होता. अनेक जाहीरातीत त्याने काम केलं होतं.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार आदित्यचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. याबाबत अद्याप ठोस कारण समोर आलेलं नाही.
मित्राने इमारतीच्या वॉचमनच्या मदतीने रुग्णलयात नेलं. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.
सोमवारी दुपारी आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळला. घरी आलेल्या मित्राने त्याला बाथरुममध्ये पडलेलं पाहिलं.
आदित्य सिंह राजपूतच्या अचानक मृत्यूने त्याचे मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
आदित्यच्या पोस्टवरुन तो कोणत्याही तणावात असल्याचं जाणवत नाही. तो नेहमी हसतमुख असल्याचं मित्र सांगतात.
आदित्यने इन्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. ज्या रुफटॉप व्ह्यू दिसत आहे. यात त्याने संडे फंडे बेस्टीजबरोबर असं लिहिलं आहे.
आदित्यच्या एका इन्स्टा पोस्टवरुन त्याने मृत्यूच्या एक दिवस आधी मित्रांबरोबर पार्टी केल्याचं समोर आलं आहे.
अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूने टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला.