बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 23 तारखला सोनाक्षीचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर विवाहसोहळा पार पडणार आहे.

Jun 19,2024


या दरम्यान सोनाक्षीचं कुटुंबासोबतचं नातंही मीडियामध्ये हॉट टॉपिक बनला आहे. आता रेडिटवर आलेल्या एका बातमी यात आणखी भर घातली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा आई पूनम आणि भाऊ लव यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. सोनाक्षीच्या फॉलोईंग लिस्टमध्ये वडील शत्रुघ्न आणि भाऊ कुश आहेत.


तर लव सिन्हा याच्या इन्स्टा फॉलोईंग लिस्टमध्ये सोनाक्षी सिन्हाचं नाव आहे. या सगळ्या गोष्टीमुळे चाहते हैराण झाले आहेत.


आई पूनम सिन्हाच्या फॉलोईंग लिस्टम्ये पती शत्रुघ्न, मुलं लव आणि कुश यांचा समावेश आहे. पण सोनाक्षी सिन्हाचं नाव नाही.


सोनाक्षी सिन्हा आणि पूनम सिन्हा आधीपासून एकमेकांना फॉलो करत नाहीत की नुकतंच अनफॉलो केलं आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.


पण यावर यूजर्स मात्र अनेक कमेंट करत आहेत. एक युजरने सोनाक्षी सिन्हाचं जहीर इक्बालबरोबर लग्न करणं कुटुंबाला आवडलेलं नसावं असं म्हटलंय. तर एका युजरने ही अफवा असल्याचं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story