विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मिर फाइल्स या चित्रपटावरुनही बराच वाद निर्माण झाला होता. पण या चित्रपटाने तब्बल 250 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटात अनुमप खेर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
केरळातून 32 हजार मुली गायब झाल्या आणि त्यानंतर त्यांना आयसिस या दहशतवादी संघटनेत सामिल करण्यात आलं. पण प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं, तेव्हा दिग्गदर्शकाने हा दावा मागे घेतला.
मी हा चित्रपटा अद्याप पाहिला नाही, पण आनंदी आहे कारण सत्य परिस्थिती मांडणारे चित्रपट बनत आहेत. ज्यांना या चित्रपटावर आक्षेप आहे, त्यांनी कोणत्याही इतर विषयावर चित्रपट बनवावा.
अनुमप खेर यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलंय या चित्रपटाला विरोध करणारे तिच लोकं आहेत, ज्यांनी द काश्मिर फाईल चित्रपटाला विरोध केला होता.
द करेळ स्टोरी चित्रपटावरुन बॉलिवूडपासून राजकीय नेत्यांपर्यंत आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच या चित्रपटावरु सुरु असलेल्या वादावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने संपूर्ण राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे.
द केरळ स्टोरी या चित्रपटात सर्वसामान्य घरातील मुलींना जगातील सर्वात आयसीस या दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आलं हे दाखवण्यात आलं आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटावरुन संपूर्ण देशभरात वाद सुरु आहे. पाच मेला संपूर्ण देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चारच दिवसात या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.