अनेक कलाकारांची मूळ नावं ही वेगळीच आहेत. अशाच 10 कलाकारांची खरी नावं जाणून घेऊयात...
कियारा आडवाणी - अभिनेत्री कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया आहे. कियाराचं मूळ नाव आलिया आडवणी असं आहे.
अक्षय कुमार - देभक्तीपर आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांमुळे मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असलेल्या अक्षय कुमारचं खरं नाव वेगळं आहे. अक्षयचं मूळ नाव राजीव हरिओम भाटिया असं आहे.
सैफ अली खान - अभिनेत्री करिना कपूरचा पती आणि अभिनेता सैफ अली खानचं सैफ हे नाव खरं नाही असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. सैफचं खरं नाव साजिद आहे.
गोविंदा - 90 च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमुळे गाजलेले अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविदांचं खरं नाव अरुण अहूजा असं आहे.
प्रीति झिंटा - अनेक वर्षांपासून मनोरंजन चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली अभिनेत्री म्हणजे प्रीति झिंटा. प्रीतिचं खरं नाव प्रीतम सिंह झिंटा असं आहे.
शिल्पा शेट्टी - आपल्या फिटनेसमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. मात्र शिल्पाचं मूळ नाव अश्विनी असं आहे.
सूर्या - दाक्षिणात्य अभिनेता सूर्या हा त्याच्या 'जय भीम' चित्रपटामुळे चर्चेत आला. सूर्याचं खरं नाव श्रवनन शिवकुमार असं आहे.
बादशाह - रॅप सिंगर असलेल्या बादशाहचं खरं नाव तुम्हाला ठाऊक आहे का? बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे.
प्रभास- आदिपुरुष चित्रपटामध्ये रामाची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने साकारली होती. प्रभासचं खरं नाव फार मोठं आहे. उप्पलापति वेंकटा सूर्यानारायण प्रभास राजू असं प्रभासचं मूळ नाव आहे.
हनी सिंग - आपल्या रॅप आणि पार्टी साँगसाठी प्रसिद्ध असलेला पंजाबी गायक हनी सिंगचं खरं नाव तुम्हाला ठाऊक आहे का? हनी सिंगचं खरं नाव हिृदेश सिंग असं आहे.