अशी ही कोकणहार्टेड गर्ल येत्या काळात मोठी तारका झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
हल्लीच पार पडलेल्या झी मराठी आयोजित पुरस्कार सोहळ्यात अंकितानं अनोख्या अंदाजात कलाकारांच्या मुलाखती घेतल्या.
गिरगावातील या शोभायात्रेच्या निमित्तानं अंकिताच्या बहिणींनीसुद्धा शोभायात्रेत हजेरी लावली होती.
अंकितानं तिच्या इन्स्टा स्टोरीमधून गिरगाव शोभायात्रेतील काही क्षण फॉलोअर्सच्या भेटीला आणले.
नऊवारी साडी, त्यावर साजेसे दागिने, केशभूषा आणि चेहऱ्यावर कमाल आनंद असं तिचं रुप सर्वांच्याच नजरेत भरलं.
यंदाच्या वर्षी अंकितानं गिरगावच्या शोभायात्रेसाठी खास मराठमोळ्या लूकला पसंती दिली होती. तिनं या लूकची उत्सुकता चांगलीच ताणून धरली होती.