जेवण बनवताना भांडं जळालं तर 5 मिनिटात 'या' ट्रिकनं करा साफ, दिसणार नाही एकही डाग

Diksha Patil
Oct 15,2024


घरी अनेकदा जेवण बनवताना भांडं जळतं. त्यावर असलेले डाग हे कमी करण्यासाठी खूप दिवस लागतात.


5 मिनिटात तुमची जळालेली भांडी कशी चमकवायची हे जाणून घेऊया.


सोड्याला पाण्यात मिक्स करून त्याची एक पेस्ट तयार करा. त्यानंतर जो भाग जळाला असेल त्यावर ही पेस्ट लावून सोडून द्या.


जर तुमच्या घरी वाइन असेल तर तुम्ही त्याचा वापर देखील करू शकता. भांड्याच्या जळालेल्या भागावर लावून सोडून द्या आणि स्क्रबररच्या मदतीनं साफ करा.

टॉमेटो केचअप किंवा पेस्ट

टॉमेटो केचअपची एक मोठी लेअर लावून ठेवा आणि सकाळी स्क्रबरनं धुवून काढा. पेस्ट ही जळालेल्या भागावर लावा आणि धोड्यावेळात धुवून काढा.


जळालेलं भांड साफ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ती लगेच धुवून काढा आणि हार्ड ब्रशचा वापर करु नका. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story