बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची लोकप्रियता अद्यापही कायम आहे
सध्या सोशल मीडियावर ऋतिक रोशनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय
एका कार्यक्रमात ऋतिकने हजेरी लावली होती. तिथे स्टेजवरच एका ७० वर्षीय महिलेने ऋतिकला अडवले
७० वर्षीय महिलेने ऋतिकला तुम्ही सिंगल आहात का? असा प्रश्न केला
तुझा जन्म होण्याआधी कित्येत वर्ष आधी माझा जन्म झालाय. जर तु माझ्या वयाचा असतास तर मीच तुझ्याशी लग्न केलं असतं, असं या महिलेने ऋतिकला म्हटलं आहे
महिलेच्या या गोड प्रपोजलवर ऋतिकने दिलेले उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे
वयाने काय फरक पडतो. मीसुद्धा वय वाढत असताना सिंगल होतो. पण आता नाहीये, असं उत्तर ऋतिकने दिलंय
ऋतिकच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास तो सध्या सबा आझादला डेट करत आहेत
सबा आणि ऋतिक लग्न कधी करणार हे मात्र अद्याप त्यांनी जाहीर केले नाहीये