हाच जस्टीन बिबर आता खासगी जीवनात अनेक आव्हानांचा सामना करक आहे असं स्पष्ट होतंय.
काही माध्यांच्या वृत्तानुसार पत्नी हेली लवकरच जस्टीनपासून घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात असून, सोशल मीडियावरही त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
बाळाचा ताबा हेली आपल्याकडेच ठेवणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे, तर हेली पोटगी म्हणून गायकाकडून 300 मिलियन डॉलर म्हणजेच 2600 कोटी रुपये इतकी संपत्ती मागण्याची शक्यता आहे.
काही वृत्तांनुसार जस्टीन व्यसनाधीन गेल्यामुळं हेलीनं नाईलाजानं त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे
लग्नाच्या वेळी जस्टीननं घेतलेलं वचन न पाळता व्यसनं सोडली नाहीत. दिवसेंदिवस त्याची वर्तणूक वाईट होत गेली.
याच कारणानं हेली या टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचली असून, चांगल्या भवितव्यासाठी ती घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, या दोघांकडून नात्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसून, आता या मुद्द्यावर नेमकं कोण प्रथम व्यक्त होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.