भारतात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ही संस्था 1983 पासून काम करत आहे. ही संस्था ‘सेन्सॉर बोर्ड’ या नावाने ओळखली जाते
चित्रपट पाहून त्याच्या प्रेक्षकांचा वयोगट ठरवून, त्यात बदल सुचवून प्रमाणपत्र द्यायचं हा निर्णय प्रामुख्याने सेन्सॉर बोर्डाकडून घेतला जातो
चित्रपट निर्मात्यांकडून प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर बोर्डातील अधिकारी एक सर्वेक्षण समिती नियुक्त करतात. सर्वेक्षण समिती चित्रपट पाहून अध्यक्षांना अहवाल देते.
बोर्डाचे अध्यक्ष चित्रपटात काही बदल सुचवून त्यावर निर्माते, दिग्दर्शकाचा होकार नकार घेऊन चित्रपटाला प्रमाणपत्र देतात.
कोणत्याही चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड बंदी घालू शकत नाही. सेन्सॉर बोर्ड फारफार चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकते. पण प्रमाणपत्र नसेल तर चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही.
2000 ते 2016 पर्यंत 793 चित्रपटांवर बंदी घातली होती. यामध्ये कामसूत्रा, बैंडिट क्वीन, फायर, ब्लॅक फ्रायडे यांचा समावेश होता.