मनोज बाजपेयी 'सिर्फ एक बंदा काफी है' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी त्यांनी सांगितले की त्यांच्यासाठी कोणतेही पात्र निवडणे कठीण आहे.
मनोज शबानानं दिलेल्या सल्ल्याविषयी बोलताना, म्हणाले "ही वेब सिरीज माझी पत्नी शबानासाठी समस्या ठरली होती. तिला वाटलं की मी कुठलीतरी सीरियल करत आहे. तिला ओटीटीबाबतही काहीच माहिती नव्हती."
"ओटीटी आणि मालिकांमधील फरक सांगितला तेव्हा तिनं मला ही वेबसीरिज न करण्याचा सल्ला दिला होता. शबाना म्हणाली होती, आपल्याला पैशांची काय गरज आहे? सगळं काही छान चाललं असताना तू तुझं करिअर का खराब करत आहेस?", असं मनोज यांनी सांगितलं.
'द फॅमिली मॅन' प्रदर्शित झाल्यनंतर शबाना यांना ओटीटीमध्ये किती ताकद आहे त्यामुळे किती यश मिळत हे कळलं.
सीरिज म्हणजे सेक्स, व्हायलंस आणि थ्रिल यावर असतात असं त्यांना वाटत होतं.
मनोज यांच्या आधी अक्षय खन्ना ही सीरिज करणार होता. मनोज यांना जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना दुसऱ्या कलाकाराचं काम करायला आवडत नाही.
मुकेश छाबडा यांनी मनोज यांना मनवण्याचा प्रयत्न केला अशात त्यांनी या सीरिजची स्क्रिप्ट मनोज यांना ऐकवली आणि त्यांनी लगेच सीरिजसाठी होकार दिला.
मनोज यांच्या या लोकप्रिय सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.