दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. तिचा हा पहिला चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला.

Jan 07,2024


'सैराट' चित्रपटामुळे ती घराघरात पोहोचली. या चित्रपटानंतर तिला ‘आर्ची’ या नावाने ओळख मिळाली.


काही दिवसांपूर्वी रिंकू ही 'झिम्मा 2' या चित्रपटात झळकली. यात तिने निर्मिती सावंत यांच्या सुनेचे पात्र साकारले होते.


आता रिंकूने नवीन फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे.


रिंकूने शेअर केलेल्या फोटोत ती भर रस्त्यात उभी असल्याचे दिसत आहे.


तर एका फोटोत ती टोपी घालून गाडीत बसल्याचे पाहायला मिळत आहे.


"तुमच्यात स्वत:ला मुक्त करण्याची शक्ती आहे", असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story