गुन गुन गर्ल फिरतीये तरी कुठं?
'महाराष्ट्राची क्रश' म्हणून ओळख असलेली सायली पाटील सोशल मीडियावर चर्चेत असते.
भावनाभाभी, गुन गुन गर्ल, महाराष्ट्राचा क्रश, सबसे कातील सायली पाटील, या नावांनी तिला हाका मारल्या जातात.
'झुंड' चित्रपटामुळे थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिची भावनाभाभी ही ओळख निर्माण झाली.
घर बंदुक बिर्याणी चित्रपटात देखील दमदार अभिनयाची चमक दाखवली. होती. अशातच आता सायली पाटीलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत
शेअर केलेल्या फोटोमध्ये सायली पाटील गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसते.
तसेच काही फोटोमध्ये ती निसर्गाच्या सानिध्यात फिरत असल्याचं दिसतंय. काळी टोपी, पांढरं जाकेट अन् जिन्स असा तिचा लूक आहे.
काही व्हिडिओ देखील सायली पाटीलने शेअर केले आहेत. त्यामध्ये ती आनंदाने बागडताना दिसत आहे.
दरम्यान, सायलीने पुण्यात आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं होतं. नृत्य, संगीत, चित्रकला हे सगळं तिला आवडतं.