'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा बॉलिवूडच्या कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. आजही या चित्रपटाचे करोडो चाहते आहेत.
या चित्रपटाच्या रिमेकसंबंधी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. पण आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी DDLJ च्या रिमेकसंबंधी असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे चाहते उत्साहित आहेत.
'फरीदून शहरयार'ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाबडा यांना DDLJ च्या रिमेकमध्ये तुम्ही कोणाला कास्ट कराल असं विचारण्यात आलं होतं?
त्यावर उत्तर देताना मुकेश छाबडा यांनी म्हटलं की, DDLJ च्या रिमेकमध्ये शाहरुखच्या जागी आर्यनला घेईन. कारण तो चार्मिंग असून चांगला अभिनेताही आहे.
तसंच काजोलच्या भूमिकेसाठी त्यांनी न्यायाचं नाव घेतलं आहे.
ते म्हणालेत की, DDLJ मध्ये काजोलच्या भूमिकेसाठी न्यासा एकदम योग्य आहे. ती सध्या अभिनयही शिकत आहे.
DDLJ चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
28 वर्षांनंतरही चित्रपटावर प्रेक्षक तेवढंच प्रेम करत आहेत. चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यात जर चित्रपटाचा रिमेक झाला तर तो चाहत्यांसाठी भेट असेल.