नुकतीच अॅमझॉन प्राईमवर रिलीज झालेली पंचायत 3 ही वेबसिरीज सर्वत्र चर्चेत आहे.
जितेंद्र कुमार उर्फ सचिवजी यांचं फुलेरा गावात पुनरागमन झाल्यानंतर काय काय होतं यावर मजेदार शैलीत भाष्य करण्यात आलंय.
पंचायतची टीम तिसरा सिझन शुट करण्यासाठी मध्य प्रदेशच्या महोड़िया गावात पूर्ण दोन महिने होती.
सिरीजमध्ये प्रमुख पात्र असलेल्या जितेंद्र कुमारचं सध्या कौतूक होताना दिसतंय. मात्र, तुम्हाला माहितीये का जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती किती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पंचायत'च्या पहिल्या दोन सीझनसाठी जितेंद्र कुमारला प्रति एपिसोड 50,000 रुपये मानधन मिळालं होतं.
तर पंचायतच्या तिसऱ्या पार्टसाठी जितेंद्र कुमारने 70,000 रुपये मानधन घेतलं आहे. टीममध्ये सर्वाधिक मानधन त्याला मिळालं.
एका अहवालानुसार जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती सुमारे 7 कोटी रुपये आहे. आलिशान घर आणि लक्झरी गाड्या देखील त्याच्याकडे आहे.
जितेंद्र कुमार पंचायत 3 नंतर आता कोटा फॅक्ट्रीच्या तिसऱ्या सिझनमध्ये देखील दिसणार आहे. त्यामुळे आता उत्सकुता वाढली आहे.