चित्रपटाच्या अपयशामुळे घेतला होता सन्यास; पण कमबॅक करताच बनले बॉलीवुडचे खलनायक!


एक असा अभिनेता ज्याने नायक बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु नशिबानं त्याला चित्रपट जगतातील सर्वोत्तम खलनायक बनवलं.


सैन्यात भरती सोडून थेट स्वप्नांची नगरी गाठून अभिनयाचा प्रवास सुरु करणारा हा अभिनेता


उंची, उत्तम शरीरयष्टी आणि अभिनयाची अनोखी राहिली यामुळे कमी काळात निर्मात्यांच्या मनात घर केलं.


हे आहेत बॉलीवूडचे खलनायक प्रेमनाथ मल्होत्रा


अभिनयाच्या जोरावर कमी वेळातच बॉलीवूड स्टार्सपेक्षा जास्त मानधन घेणारे अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली.


'बादल', जॉनी मेरा नाम' आणि 'जानी दुश्मन' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी बॉलीवूडला अभिनयाची भुरळ घातली.


रामोला, मधुबाला, निकार सुलतान, सुरैया, बिना राय या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत त्यांनी काम केलं होतं.


राज कपूर , देवानंद ,दिलीप कुमार यांची फी जेव्हा हजार रुपयांच्या आकड्यात होती तेव्हा प्रेमनाथ एका चित्रपटासाठी 1.25 लाख रुपये एवढी फी घेत होते.


1953 मध्ये 'औरत' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते अभिनेत्री बिना रायच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.


खलनायक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळत होती. पण त्यांचे अनेक चित्रपट बॉक्सऑफिस वर पडू लागले, त्यांना त्यांचं अपयश सहन झालं नाही म्हणून ते काही काळासाठी हिमालयात गेले होते


तिकडून परत आल्यावर प्रेमनाथ यांनी दणक्यात कमबॅक करून एकावर एक हिट चित्रपट केले.

VIEW ALL

Read Next Story