'झी मराठी' वाहिनीवर सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवे पर्व हे प्रचंड गाजते आहे.
2008 साली आलेल्या 'लिटिल चॅम्प्स'च्या पर्वानंतर आता हे पर्व प्रचंड गाजते आहे.
'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून अरविंद जगताप यांनी लिहिली पत्रं सागर कारंडे हा पोस्टमनच्या वेशात येऊन वाचायचा.
त्याच्या या पत्रवाचनाचे सर्वच जणं फॅन्स होते. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.
त्याचे हे व्हिडीओही तूफान व्हायरल व्हायचे. मध्यंतरी सागर कारंडे प्रेक्षकांना पोस्टमनच्या रूपात दिसत नव्हता. त्यामुळे प्रेक्षक त्यांना खूपच मीस करत होते.
आता सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पर्वातून सागर कारंडे पुन्हा एकदा पोस्टमनच्या वेशातून दिसतो आहे. त्यानं खास सुरेश वाडकरांसाठी पत्रं लिहिलं आहे. @zeemarathiofficial या इन्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सध्या हा व्हिडीओ फारच चर्चेत आहे. यावेळी या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही खूप चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.
सुरेश वाडकरांनी बालपणापासून जो संघर्ष केला त्याविषयी ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास यावर या पत्राद्वारे ज्या आठवणी सगळ्यांच्यापुढे तरळल्या यावरून उपस्थितांच्या डोळ्यातून पाणीच आले.
यावेळी या मंचावर सागर कारंडेशी सुत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे हिनं संवाद साधला. सोबतच परीक्षक वैशाली माडे आणि सलील कुलकर्णीही उपस्थित होते. यावेळी कार्तिकी गायकवाडही उपस्खित होती.