एका महिन्यात 15 किलो वजन झालं कमी
अभिनेत्री सना खानला एक महिन्यांपूर्वी गोंडस बाळा जन्म दिला होता. ती गरोदरपणापासूनच प्रत्येक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत असतं.
जागतिक स्तनपान सप्ताहा सुरु असून तिने बाळाला स्तनपान करण्याची सल्ला दिली. तिने बाळाला स्तनपान केल्यामुळे एक महिन्यात तिचं वजन कमी होण्यास मदत झाली, असं तिने सांगितलं.
अनेक वेळा स्त्रिया आपल्या मुलांना स्तनपान करणं टाळतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, एका महिलेसाठी ही खूप सुंदर भावना आहे.
पण मला समजत नाही का महिला असं करतात. बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान महत्त्वाचं आहे. कारण दूध आरोग्यदायी मानलं जातं.
म्हणूनच मुलांसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे पोट निरोगी ठेवते. यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यासोबत ते चांगल्या पद्धतीने वाढता.
अभिनेत्री असंही म्हणाली की, प्रसूतीनंतर स्तनपान केल्याने तिचं वजन कमी होण्यास मदत झाली. एका महिन्यात तिचं वजन 15 किलो वजन कमी झालं आहे.
वजन कमी झाल्याने मलाही आश्चर्य वाटले आणि विज्ञानाचाही असा विश्वास आहे की स्तनपानामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
अभिनेत्री म्हणते की, अनेक नवीन मॉम्स सार्वजनिक ठिकाणी मुलांना स्तनपान करताना दिसतात. पण मला ते पटत नाही.
2020 मध्ये सना खानने अभिनय क्षेत्र सोडलं आहे.