शाहरुखने भाडेतत्वावर दिलंय आपलं मुंबईतलं पहिलं घर! महिन्याचं भाडं पाहून डोळे पांढरे पडतील

Swapnil Ghangale
Dec 03,2023

'मन्नत'ची लोकप्रियता

अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला हा मुंबईमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ झाला आहे.

छोट्या घरात राहायचा

मात्र 'मन्नत'मध्ये राहण्यापूर्वी शाहरुख खान वांद्रे येथील एका छोट्या घरात राहायचा हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.

कुठे होतं हे घर?

शाहरुख खान 'मन्नत'मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी कार्टर रोडमधील श्री अमृत अपार्टमेंटमधील सातव्या मजल्यावर राहायचा.

3 BHK फ्लॅट

शाहरुख खानचं हे मुंबईतील आधीच घर म्हणजे एक 3 BHK फ्लॅट होता.

गौरी आणि शाहरुखनेच केलेला खुलासा

1997 साली शाहरुख आणि गौरी हे दोघे सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये सहभागी झाले होते तेव्हा त्यांनीच या घराची माहिती आणि फोटो शेअर केले होते.

मुंबई घेतलेली पहिली जागा

समोरच समुद्र असलेला हा फ्लॅट म्हणजे गौरी आणि शाहरुखने मुंबई घेतलेली पहिली जागा होती.

2013 पासून भाडेतत्वावर

शाहरुख खानने हे घर 2013 पासून भाडेतत्वावर दिलं आहे.

महिन्याचं भाडं किती?

या घरासाठी शाहरुख महिन्याला 3 लाख रुपये भाडं घेतो.

सिक्युरिटी डिपॉझिटचा आकडा पाहिला का?

शाहरुखने या घरासाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तब्बल 15 लाख रुपये घेतले आहेत.

चेकही शाहरुखच्या नावाने

शाहरुख खानच्या घराचा भाडेतत्वावर देण्याचा करार शाहरुखच्या नावानेच झाला. त्यामुळे चेकही त्याच्याच नावाने देण्यात आलेला.

इथेच झाला आर्यनचा जन्म

याच घरामध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जन्म झाला होता.

बरेच वर्ष इथे वास्तव्य

'मन्नत'मध्ये राहायला जाण्याआधी गौरी आणि शाहरुख बरेच वर्ष इथे वास्तव्यास होते.

VIEW ALL

Read Next Story