सोशल मीडियावर अनेकदा मराठी किंवा हिंदी सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे शेअर होतात.
सोबतच त्यांच्या या क्यूट फोटोंकडे पाहून सगळेच भारावून जातात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं आपला लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी ही आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावरही अनेकदा चर्चा रंगताना दिसते.
सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिनं शेअर केलेल्या तिच्या लहानपणीच्या फोटोची. यात ती खूपच क्यूट दिसत असून तिनं तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.
या फोटोत ती, तिची बहीण क्षिप्रा जोशी आणि आई - वडिल दिसत आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे.
आपला वडिलांना बिलगून हनवटीवर हात ठेवत तिनं फारच क्यूट पोझ दिली आहे.
यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'Safety Net!'
तिच्या या फोटोखाली अनेकांच्या कमेंट्सही आल्या आहेत. स्पृहा जोशीला लहानपणी डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्याकडून बालश्री प्रदान करण्यात आली आहे. सोबतच ती लोकप्रिय अभिनेत्री आणि कवियत्री आहे.