भारतात बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या तसंच, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या बॉलिवूडच्या 10 चित्रपटांवर परदेशात मात्र बंदी आहे. याचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
मिथुन चक्रवर्ती, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला ओ माय गॉड हा चित्रपट भारतात हिट ठरला होता. मात्र, मिडल ईस्ट देशांत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाला पाकिस्तानातून मोठा विरोध करण्यात आला होता. पाकिस्तानी सेंसर बोर्डने या चित्रपटावर बंदी आणली होती. हा चित्रपट सभ्यता आणि संस्कृतीविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
अक्षय कुमारचा हा चित्रपट पाकिस्तानात बॅन करण्यात आला आहे. या चित्रपटातून देशाची प्रतिमा चुकीची दाखवण्यात आली असल्याचा आरोप पाकिस्तानी सरकारने केला आहे.
हा चित्रपटदेखील पाकिस्तानात बॅन करण्यात आला होता. या चित्रपटात सोनम कपूर दोन हिंदू मुलांच्या प्रेमात पडते, अशी कथा आहे. या कथेमुळेच पाकिस्तानात हा चित्रपट बॅन करण्यात आला.
विद्या बालन हिचा हा चित्रपट सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित आहे. बोल्ड सिन्स असल्याकारणाने अनेक देशात हा चित्रपट बॅन करण्यात आला.
सैफ अली खानच्या या चित्रपटाला पाकिस्तानी सेंसर बोर्डने बॅन केले होते. चित्रपटात देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मुंबईतील दंगलींवर आधारित असलेल्या या चित्रपटाला सिंगापूरमध्ये विरोध सहन लागला. चित्रपटात अनेक हिंसक घटना असल्यामुळं सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली होती.
अक्षय कुमारच्या या चित्रपटाला तीन अरब देशाच्या सेन्सर बोर्डने एका दृश्यावर आक्षेप घेत बॅन केले होते.
नेपाळमध्ये अक्षय कुमारच्या या चित्रपटाला बॅन करण्यात आलं होतं. नेपाळी समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.