नासाचं संशोधन केंद्र

NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण

Sep 14,2023

क्रांतीकारक कामगिरी

अंतराळ क्षेत्रात क्रांतीकारक कामगिरी करणाऱ्या नासानं आजवर अनेक दावे केले, अनेक सिद्धांत मांडले. अंतराळ नासानं खऱ्या अर्थानं जगाच्या जवळ आणलं.

प्रत्येक बातमी नजरा वळवणारी

अशा या नासाकडून येणारी प्रत्येक बातमी नजरा वळवणारी आणि थक्क करणारी असते. तुम्हाला याच नासाचं बॉलिवूड कनेक्शन माहितीये का?

'स्वदेस'

अभिनेता शाहरुख खान याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या, आशुतोष गोवारिकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'स्वदेस' चित्रपटाचं चित्रीकरण नासामध्येच झालं आहे.

जाणून आश्चर्य वाटतंय ना?

जाणून आश्चर्य वाटतंय ना? 2004 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यानंतर अनेकांनीच चित्रपटातील 'नासा'च्या भूमिकेबदद्ल कुतूहल व्यक्त केलं.

नासाचं संशोधन केंद्र सर्वांच्याच नजरेस

महाराष्ट्रातील मेणवली आणि वाई इथंही या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं. पण, शाहरुखच्या अमेरिकेतील दृश्यांमध्ये मात्र नासाचं संशोधन केंद्र सर्वांच्याच नजरेस पडलं.

केनेडी स्पेस सेंटर

NASA च्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर आणि फ्लोरिडामध्ये चित्रपटाच्या काही दृश्यांचं चित्रीकरण पार पडलं होतं. अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटर इथं हे संशोधन केंद्र असल्याचं सांगण्यात येतं.

नासाचं केंद्र

नासाचं हे केंद्र 1968 मधील मानवाच्या अंतराळ मोहिमेपासून अस्तित्वाच असणाऱ्या पहिल्या अंतराळ केंद्रांपैकी एक आहे. केनेडी स्पेस सेंटर त्याचाच एक भाग.

तुम्ही हा चित्रपट पाहिला का?

एका भारतीय शास्त्रज्ञाच्या प्रत्यक्ष जीवनावर या चित्रपटाचं कथानक आधारलेलं होतं. तुम्ही हा चित्रपट पाहिला का?

VIEW ALL

Read Next Story