168 वरून थेट 118; तन्मय भट्टनं कसं घटवलं 50 किलो वजन? दिल्या डाएट Tips

Aug 27,2024

कॉमेडियन

कॉमेडियन आणि युट्यूबर तन्मय भट्टचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामागचं कारण ठरत आहे ते म्हणजे त्याचं घटलेलं वजन.

वजन

तन्मयनं इतकं वजन कमी केलं आहे की त्याचं अगदी नवं रुप पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीदरम्यान खुद्द तन्मयनंच आपण 50 किलो वजन घटवल्याचं म्हटलं असून, आपला हा प्रवास सुरूच असल्याचं सांगितलं.

168 किलो

'बंगळुरूला जाण्याआधी माझं वजन 168 किलो इतकं होतं. मी जानेवारी 2022 मध्ये वजन घटवण्यासाठीचा बेत आखला. अनेक प्रयत्न करुनही माझं वजन वाढतच चाललं होतं. पण, जीवनशैलीमध्ये मी बदल केले आणि त्याचे परिणामही दिसले', असं तो म्हणाला.

जीम

सायंकाळी 5 नंतर मी कोणालाही वेळ देत नाही असं सांगत 5 ते 6 बॅडमिंटन आणि त्यानंतर जीमला जातो असं तन्मयनं स्पष्ट केलं.

वेट लिफ्टींग

तीन महिने बॅडमिंटन आणि त्यानंतर वेट लिफ्टींग ट्रेनिंग अशी सवय त्यानं स्वत:ला लावली. पुढं त्यानं यामध्ये जीमचाही समावेश करत सर्व गोष्टींचा योग्य तो समतोल राखल्याचंही सांगितलं. 'मी वजन कमी करण्यासाठी घरी काहीही पदार्थ बनवणं बंद करत फक्त ऑर्डर केलेल्या जेवेणाला प्राधान्य दिलं' हा अजब खुलासाही त्यानं केला.

Unhealthy

मी प्रचंड आळशी असून, घरी काही बनवलं तर ते Unhealthy च असेल त्यामुळे ऑनलाईन कधीही काही मागवण्याचा प्रश्न यायचा तेव्हा ते हेल्दीच असायचं असंही तन्मयनं कबुल केलं.

संतुलित आहार

दिवसातून एका वेळचं जेवण, 16 तासांचं फास्टिंग असं सूत्र तन्मयनं अंगीकारलं. त्याच्या माहितीनुसार सध्या तो दिवसातून एकदा संपूर्ण संतुलित आहार घेतो. त्याशिलाय काही लहानसहान स्नॅक ब्रेकही घेतो.

VIEW ALL

Read Next Story