ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक मानधन घेणारे भारतातील 'हे' 6 कलाकार

Feb 09,2025


सध्या प्रेक्षक हे ऑनलाईन प्रदर्शित होणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात बघत असतात. आता ओटीटी प्लॅटफॉर्म हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची पहिली पसंत ठरत आहे.


प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटातील अभिनेत्यांच्या मानधनाविषयी क्वचितच माहिती असेल. 'या' बॉलीवूड कलाकारांना OTT वर काम करण्यासाठी सर्वात जास्त मानधन मिळते.

अजय देवगण

ओटीटी वर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये अजय देवगणचे नाव सर्वात पुढे आहे. रिपोर्ट्सनुसार, अजयने 'रुद्र: द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजसाठी 125 कोटी रुपये मानधन घेतले होते.

जयदीप अहलावत

जयदीप अहलावत त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पाताल लोक'च्या दुसऱ्या सीझनमुळे सध्या चर्चेत आहे. नुकत्याच समोर आलेल्या मिडीया रिपोर्टनुसार, जयदीप अहलावत ओटीटी वरील चित्रपटांसाठी 20 कोटी रुपये इतके मानधन घेतो.

सैफ अली खान

सैफ अली खानने ‘सैकर्ड गेम्स’ आणि 'तांडव' सारख्या प्रसिद्ध शोज मधून डिजिटल जगतात खास ओखळ निर्माण केली आहे. सैफ आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रोजेक्टसाठी 15 कोटी रुपये मानधन घेतो.

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठीने सिल्वर स्क्रिन सोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रियता मिळवली आहे. ‘मिर्जापुर’ फ्रँचाइजी मधून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा हा अभिनेता कोणत्याही चित्रपट किंवा सिरिजसाठी 12 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो.

करीना कपूर

करीना नेटफ्लीक्सवर प्रदर्शित झालेल्या 'जाने मन' या चित्रपटात झळकली होती. करीना डिजिटल प्रोजेक्टसाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेते.

मनोज वाजपेयी

मनोज वाजपेयीने ‘फॅमिली मैन’ आणि ‘साइलेंस’ सारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. मनोज आपल्या ओटीटी प्रोजेक्टसाठी जवळपास 10 कोटी रुपये मानधन घेतो.

VIEW ALL

Read Next Story