2023 मध्ये बॉलिवूडमध्ये एक भन्नाट ट्रेण्ड दिसून आला तो म्हणजे आयटम साँगसाठी तब्बल 5 कोटींपर्यंतचं मानधन काही अभिनेत्रींना देण्यात आलं.
यापैकीच एका अभिनेत्रीची मागील वर्षी सोशल मीडियापासून हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलीच चर्चा झाली.
तिने तिच्या प्रेझेन्सने या गाण्याला चार चाँद लावले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न पडला असेल तर दक्षिणेतून येऊन हिंदीमध्येही आपल्या कामाचा प्रभाव अगदी कमी काळात पाडणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे समंथा राऊथ प्रभू!
यापूर्वी मलायका अरोराने आणि नोरा फतेहीने एका आयटम साँगसाठी तब्बल 2 कोटींचं मानधन घेतलं होतं. हा विक्रमही समंथाने मोडला.
त्यापूर्वीही करिना कपूरने एका आयटम साँगसाठी 1.5 कोटी, कटरीनाने 2 कोटी रुपये तर जॅकलीनने 3 कोटी रुपये घेतलेली. मात्र समंथा त्यांच्याही पुढे आहे.
आघाडीच्या अभिनेत्री एका चित्रपटासाठी जेवढं मानधन घेत नाही तेवढं मानधन समंथा एका आयटम साँगसाठी घेते.
अगदी रश्मिका मंधानाही एका चित्रटातील प्रमुख भूमिका साकारण्यासाठी 2 कोटी रुपये घेते. पण समंथाची एका गाण्याची फी 5 कोटी रुपये इतकी आहे.
समंथाने 'पुष्पा' चित्रपटामध्ये 'ऊ आंटा वा वा' गाण्यासाठी तब्बल 5 कोटींचं मानधन घेतलं होतं.
मात्र 'ऊ आंटा वा वा'मध्ये समंथाने या गाण्यात केलेला डान्स खरोखरच भाव खावून गेला.