दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून अभिनेता विजय देवरकोंडाला ओळखले जाते. ‘लायगर’ चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

नम्रता पाटील
May 08,2024


विजय देवरकोंडाने त्याच्या खासगी आयुष्य, लव्ह आणि सेक्स लाइफ याबद्दल खुलासे केले आहेत.


‘लायगर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजय देवरकोंडाने ‘कॉफी विथ करण 7’मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने लव्ह बाइट्स, सेक्स याबद्दल भाष्य केले.


“माझ्या मेकअपमनने कन्सिलरच्या मदतीने लव्ह बाइट्स लपवले होते, असे विजय देवरकोंडा यावेळी म्हणाला होता.


याशिवाय आपल्या सेक्स लाइफबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सार्वजनिक ठिकाणी सेक्स केलं आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केलं आहे.”


यानंतर करणने विजय देवरकोंडाला थ्रीसमसंबंधी प्रश्न विचारला. “कधी थ्रीसम केला आहे का?” असा प्रश्न करणने विचारला होता.


त्यावर विजय म्हणाला, “नाही, पण मी भविष्यात कधीतरी हे करू शकतो.”


"मला एका चित्रपटात दारू प्यायल्याचा सीन शूट करायचा होता. पण त्यावेळी मी खरंच दारू प्यायलो आणि मी नशेत होतो. नशेत असताना मला माझे संवादच आठवत नव्हते, मी फक्त हसत होतो."


"निर्मात्यांच्या लक्षात आलं की मी खूप नशेत आहे आणि पुढे शूटिंग करू शकणार नाही, त्यामुळे त्यांनी अखेर शूटिंग रद्द केलं.” असा किस्सा त्याने यावेळी सांगितला होता.

VIEW ALL

Read Next Story