अधिक काळ एसीमध्ये राहणाऱ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो, असं वैज्ञानिक सांगतात.
डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे असा समस्याही एसी रुममधील आर्द्रता कमी झाल्याने उद्भवतात.
एसी असलेल्या ठिकाणी हवेत आर्द्रता कमी असते. त्यामुळेच डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या निर्माण होते.
दिर्घकाळ एसीमध्ये राहिल्यास उष्णता सहन करण्याची शरीराची क्षमता कमी होते. अशा लोकांना उन्हाचा त्रास अधिक प्राकर्षाने जाणवतो.
सतत एसीमध्ये राहणाऱ्यांना उष्णतेमध्ये गेल्यास त्रास होतो आणि त्यांना अशा वातावरणाशी जुळवून घेता येत नाही.
ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी एसीचा मोठ्या प्रमाणात वापर करु नये असा सल्ला दिला जातो. असं केल्यास मायग्रेनचा त्रास पुन्हा वाढू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
उन्हाळ्यामध्ये एसीची अतिवापर केल्यास डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता वाढते.
एसीमध्ये बसून काम करणाऱ्यांना एसीत काम न करणाऱ्यांपेक्षा श्वसनासंदर्भातील समस्या अधिक असतात.
जे लोक एसी ऑफिसमध्ये काम करतात त्यांची प्रकृती ही व्हेंटीलेशन म्हणजेच उघड्या खिडक्या असलेल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांपेक्षा नाजूक असते.
एसीच्या अति वापराने डिहायड्रेशनबरोबरच त्वचा कोरडी पडण्याचा त्रासही होऊ शकतो.
एसी रुम थंड करण्यासाठी रुममधील बाष्प खेचून घेतो. त्यामुळे त्वचेमधून पाणी खेचलं जातं आणि डिहायड्रेशनचा त्रास यामुळे होऊ शकतो.
एअर कंडीशनरच्या अधिक वापरामुळे डोकेदुखी, खोकला, ड्राय स्क्रीन यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
मात्र सतत एसीमध्ये राहणं फार धोक्याचं ठरु शकतं. यासंदर्भातील अहवाल बेवएमडीने जारी केला आहे. हा अहवाल काय म्हणतो पाहूयात...
आपल्यापैकी अनेकजण हे कारमध्ये, घरी आणि ऑफिसमध्येही एअर कंडिशनरमध्येच असतात.
एअर कंडीशनर हा आरोग्यासाठी फारच धोकादायक असतो हे तुम्हाला माहितीये का?