लोखंडी कढईत दोन ते तीन आवळे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते आवळे मेहंदीमध्ये पेस्ट करुन ठेवा. यानंतर ही मेहंदी केसाला लावून तीन ते चार तास लावून ठेवा
तीन-चार चमचे मेंदीमध्ये समान प्रमाणात इंडिगो पावडर मिसळा. नंतर त्यात एक चमचा कॉफी पावडर मिसळा आणि थोडे गरम पाणी घालून स्मूद पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि तीन-चार तास राहू द्या, नंतर केस सामान्यपणे धुवा.
मेंदीमध्ये अंडी आणि लिंबू मिसळल्याने केसांना सुंदर रंग येतो. याशिवाय केस निरोगी आणि चमकदार बनतात.
मेंदीमध्ये केळी मिसळून लावल्याने केसांना रंगही चांगला येतो. यासाठी एक पिकलेले केळ घेऊन ते चांगले मॅश करून त्याची पेस्ट बनवा.
केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी तुम्ही मेंदीमध्ये मोहरी, खोबरेल किंवा एरंडेल तेलही मिक्स करू शकता. यासाठी सुमारे पन्नास ग्रॅम तेलात दोन-तीन चमचे मेंदी पावडर मिसळा.