नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय

Diksha Patil
Aug 05,2023

अननस ज्यूस

अननस ज्यूसमुळे रक्त प्रवाह आणि रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे त्वचेची पोत सुधारण्यास मदत होते.

पपई ज्यूस

पपईमध्ये टोमॅटोसारखेच बीटा-कॅरोटीन असतं. हानिकारक अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास आणि सनबर्न, त्वचेची लालसरपणा टाळण्यास यांनी फायदा होतो.

संत्रा ज्यूस

व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत असण्याबरोबरच, पेशींच्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी देखील उत्तम आहे.

कलिंगड ज्यूस

कलिंगड तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक आर्द्रतेची पातळी वाढवण्यास सक्षम करण्यास मदत करतो.

काकडीचा ज्यूस

हे व्हिटॅमिन बी, के आणि बी-6 सारख्या विविध जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. त्यात कॅफीक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड देखील आहे. जे त्वचेमध्ये पाणी टिकवून ठेवण्यास आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

ग्रीन अॅपल ज्यूस

अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने भरपूर असलेल्या ग्रीन अॅपल तुमच्या त्वचेची लवचिकता सुधारते. अकाली वृद्धत्व रोखते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो.  

बीटरूट ज्यूस

बीटरूट ज्यूसमध्ये भरपूर मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, झिंक, आयर्न इत्यादी असतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा चमकदार होते.

गाजर ज्यूस

गाजरामध्ये कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्सचं आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेला फायदा होतो. (All Photo Credit : Freepik) (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story