जर तुम्ही साखर घालून अंडी शिजवत असाल तर त्या दोघांमधून बाहेर पडणारे अमीनो अॅसिड मानवी शरीरासाठी विषारी बनू शकते. आणि तुमच्या आरोग्यफायसाठी देखील हानिकारक ठरते.
चहा आणि अंडी हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्याने बद्धकोष्ठता निर्माण करू शकते, जे आपल्या शरीराला गंभीर नुकसान करू शकते.
सोया दूध हे वनस्पती-आधारित प्रोटीन स्त्रोतांपैकी एक आहे. ते अंड्यांसोबत खाणे टाळले पाहिजे कारण या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन प्रमाण वाढते आणि त्याचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो.
जर तुम्ही अंडी आणि केळी एकत्र खात असाल, तर हे अन्न एकत्र पोटाला जड असते आणि पचायला जास्त वेळ लागतो. केळी खाल्ल्यानंतर अंडी खाणे टाळावे . केळी आणि अंडी यांचे मिश्रण शरीरासाठी हानिकारक आहे.
मांसातील अतिरिक्त चरबी आणि प्रोटीन हे पदार्थ एकत्र पचण्यास कठीण बनवू शकतात. त्यांचे एकत्र सेवन केल्याने तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवू शकतो, म्हणूनच तुम्ही मांसासोबत अंडी खाणे टाळावे.
कधीही अंडीसोबत हे दोन्ही फळे एकत्र करू नये. विशेषतः लिंबू आणि टरबुज . लिंबू आणि टरबुज मध्ये सिट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते आणि ते अंड्यांसोबत खाणे त्रासदायी असू शकते.
अंडी आणि मासे खाल्ल्यानंतर बहुतेक लोकांना पोटात अस्वस्थतेचे त्रास होते. काहींना तीव्र अतिसार आणि ओटीपोटात जडपणा असतो. पदार्थ एकत्र केल्याने एलर्जीची होण्याचा धोका देखील असतो. दोन्ही पदार्थ मजबूत ऍलर्जीन आहेत.