बेली फॅट कमी करण्यासाठी आपल्यापैकी काही जणं प्रचंड मेहनत घेतात. मात्र बेली फॅट कमी करण्याच्या दरम्यान काही छोट्या छोट्या चुका होतात.
अशाच चुकांमुळे बेली फॅट कमी होण्यापेक्षा ते वाढू लागतं. जर तुम्हीही अशा प्रकारच्या चुका करत असाल तर त्या त्वरित बदला.
कॅलरी कंट्रोल करण्याच्या नादात आपण पौष्टीक आहारात देखील कमी करतो. यामुळे शरीरात स्नायू आणि पाण्याची कमतरता जाणवते.
जर तुम्ही दिवसभरात कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज करत नसाल तर वजन कमी करणं मुश्किल होतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाईज करणं फार गरजेचं आहे.
अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढतं. त्यामुळे कमीत-कमी 7-8 तासांची झोप घेणं गरजेचं आहे.
ताणतणावामुळे शरीरात कार्टिसोल हार्मोनची मात्रा वाढते. शरीरात या हार्मोनची मात्रा वाढली की, मेटाबॉलिझमची क्रिया कमी होते. मेटाबॉलिझम प्रक्रियेचा रेट कमी झाला की वजन घटवणं कठीण होतं.