Thyroid Disease : थायरॉईड हा आजार अती सामान्य आजार झाला आहे. तसेच थायरॉईडच्या समस्या दोन प्रकारच्या असतात. एक हायपर-थायरॉइड आणि दुसरा हायपो-थायरॉइड. जर तुम्हालाही थायरॉईड पासून सुटका हवी असेल तर तुमच्या आहारात घटकांचा समावेश करायला विसरू नका.
व्हिटॅमिन डी थायरॉईड विकारांशी लढण्यास मदत करते. त्यामुळे मशरूम, सॅल्मन आणि अंडी खाल्यास शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासत नाही.
सेलेनियम थायरॉईडचे आरोग्य राखण्यास मदत करते. म्हणूनच आहारात ऑयस्टर, सार्डिन सॅल्मन आणि ब्राझील नट या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे.
हायपोथायरॉईडीझम हे शरारातील झिंकच्या कमतरतेमुळे होतं. त्यामुळे ऑयस्टर काजू आणि शिंपले या गोष्टींचा समावेश केल्यास शरीराला पुरेसे झिंक मिळण्यास मदत होते.
मासे, कोळंबी आणि अंडी यामध्ये आयोडीन सारखे प्रथिने मुबलक प्रमाणात मिळते. ज्यामुळे T3 आणि T4 असे शरीरासाठी अत्यंत आवश्यक पोषक त्तव तयार करण्यात मदत होते.
मॅग्नेशियम शरीरात अत्यंत आवशक आहे. हेच मॅग्नेशियम भोपळ्याच्या बिया, तीळ आणि बदामांमध्ये आढळणारे शरीराला लाभदायक ठरते.
थायरॉईड व्हिटॅमिन बी शरीरासाठी आवश्यक असतात. पालेभाज्या, चिकन आणि शेंगांमुळे शरीराला व्हिटॅमिन बी मिळण्यास मदत होते.