रोज कोल्ड ड्रिंकचे सेवन हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे. याचे अनेक दुष्परिणाम होतात.
कोल्ड ड्रिंकच्या सेवनाने फुप्फुसासंबंधी आजार होण्याची दाट शक्यता असते.
कोल्ड ड्रिंक मधील सोडा हृदयासंबंधी होणाऱ्या आजारांना आमंत्रण देतो.
काही कोल्ड ड्रिंक मध्ये फॉस्फरिक ऍसिड असते. यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. परिणामी हाडे लवकर कमजोर होतात.
कोल्ड ड्रिंकमध्ये असलेल्या सोड्यात ऍसिड आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दात खराब होवून बॅकटिरिया यासारखे आजार होतात.
रोज कोल्ड ड्रिंक प्यायल्यास शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते.
कोल्ड ड्रिंक मध्ये असलेल्या सोड्यामध्ये शुगरचे प्रमाण जास्त असते. यामुळे टाइप-2 चा डायबिटीस होण्याची दाट शक्यता असते.