जेव्हा लठ्ठपणा वाढतो तेव्हा आपल्या पोटावर आणि त्याच्या आजूबाजूला चरबी सर्वात वेगाने वाढते.
Belly Fat कमी करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. यासाठी लोक जास्त जास्त घाम गाळतात.
जिममध्ये भरपूर घाम गाळून आणि डाएटिंग करुनही लोक पोटाची चरबी कमी करण्यात अपयशी होतात.
या समस्येवर आयुर्वेदातील तीन गोष्टी Belly Fat कमी करण्यासाठी रामबाण ठरेल. यामुळे तुमच्या पोटाची चरबी सहज वितळेल.
पोटाची चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी आयुर्वेदातील त्रिफळा खूप महत्त्वाचं आहे.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिळसून प्यायल्यानेही पोटाची चरबी कमी होतं.
पचन सुधारण्यासोबतच आल्याचा रस चयापचय वाढवण्यासही मदत करतो.
आल्याच्या काळ्या चहाला तुम्ही तुमच्या सामान्य चहाने बदला यामुळे तुमचं वजनही कमी होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)