उन्हाळ्यात बदाम खावं की नाही? डॉक्टर काय म्हणतात?

Saurabh Talekar
May 05,2024

बदाम

बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात.

शरीरातील उष्णता

शरीरातील उष्णतेमुळे तुम्हाला फोड, पिंपल्स आणि इतर समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. भिजवलेले बदाम पोषक तत्व शरीराद्वारे सहज शोषून घेण्यास मदत करतात.

डॉक्टर म्हणतात...

त्यामुळे उन्हाळ्यात बदाम खावं की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर आता डॉ. मोहम्मद हैदर यांनी उत्तर दिलंय.

पोष्टिक मूल्य

बदाममध्ये पोष्टिक मूल्य जास्त असतं. त्यामुळे त्याचा फायदाच शरिराला होता. बदामामध्ये अतिरिक्त पोषक घटक असतात.

सावधगिरी

ऋतू कोणताही असो पण थोडी सावधगिरी बाळगून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो, असं डॉ. हैदर यांनी सांगितलंय.

भिजवलेले बदाम

उन्हाळ्यात भिजवलेले बदाम खाल्ल्याने ते चांगले पचतात, त्यामुळे तुमचं पोषण देखील वाढतं.

भिजवून सेवन करा

बदाम एका भांड्यात किमान ४-८ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा आणि नंतर सकाळी ताज्या पाण्याने धुवा आणि नंतर सेवन करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

VIEW ALL

Read Next Story