सीताफळ हे आरोग्यासाठी फायदेशीर असतेच पण त्याचबरोबर त्याच्या बियांमध्येही पोषक तत्वे असतात.
सीताफळाच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडेंट असतात. तसंच, व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळले जाते. ज्यामुळं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
सीताफळाच्या बियामध्ये व्हिटॅमिन बी असते ज्यामुळं शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते.
बियांमध्ये असलेले मॅग्नीशियम शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. सीताफळाच्या बिया खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
सीताफळाच्या बियांमध्ये अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती असते. त्यामुळंच अनेक औषधांमध्ये सीताफळाच्या बियांचा वापर केला जातो.
वजन कमी करण्यासाठी सीताफळाचे बी खूप फायदेशीर आहेत. त्यासाठी तव्यावर भाजून तुम्ही बिया खाऊ शकता.
सीताफळांच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए आढळते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)