चटपटीत, चमचमीत पाणीपुरी खाण्याचे आरोग्यासाठी आहेत भन्नाट फायदे

चटपटीत, चमचमीत पाणीपुरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. पाणी पुरी आवडत नाही असा व्यक्ती सापडणे अवघडच आहे. पण तुम्हाला हे माहितीये का पाणीपुरी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Mansi kshirsagar
Sep 05,2023


रगडा, मसालेदार पाणी, टम्म फुगलेल्या पुऱ्या हे कॉम्बिनेशन तुमचं वजन झपाट्याने कमी करु शकतात. पाणीपुरी आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे हे जाणून घ्या.


पाणी पुरीमध्ये असलेल्या पाण्यामुळं तुम्ही अॅसिडिटीवर मात करु शकतात. कारण, पाणीपुरीसाठी बनवण्यात आलेले पाणी हे जलजीराचे असते त्यात आले, जिरे, पुदिना, काळे,मीठ, धणे असतात. त्यामुळं पोट स्वच्छ होते.


तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यावर पाणीपुरीचा पर्याय चांगला आहे. पाणीपुरीचं पाणी मसालेदार आणि चटपटीत असतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही


पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी आंबट आणि तिखट मसाल्यांचा वापर करतात. तुमचे तोंड आले (mouth ulcer) असेल तर हे मसाले त्यावरील रामबाण उपाय आहेत


पाणीपुरीत फक्त पाणी आणि उकडलेले पदार्थ असल्याने कॅलरीज कमी होतात आणि त्यामुळं वजनही वाढण्याचा धोका नसतो.


मात्र, शक्यतो पाणीपुरी घरात तयार करुनच खावी. तुम्ही घरी गव्हाच्या पुर्‍या तयार करून कमी तेलात तळू शकता व घरगुती पाणीपुरी खाऊ शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story