उकडलेले, मोड आलेले की भाजलेले?; कोणते चणे आहेत शरीरासाठी लाभदायक

चणे खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.

Mansi kshirsagar
Jun 03,2023


उकडलेले, मोड आलेले आणि भाजलेले चणे अशा तीन प्रकार चणे खाणं पसंत करतात


तुमच्या आवडीनुसार आणि आरोग्यशैलीनुसार तुम्ही चणे तुमच्या डायटमध्ये सामील करु शकतात


भाजलेले चणे चविष्ट असतातच पण त्याचबरोबर ते औषधीदेखील असतात. त्यामुळं तुम्हाला जर हे आजार असतील तर तुम्ही भाजलेले चणे खाणे सुरू करा


तुम्हाला मधुमेह नियंत्रणात आणायला असेल तर तुम्ही भाजलेले चणे खाऊ शकता. त्यामुळं तुमचा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल


भाजलेले चणे खाल्ल्याने थायरॉइडदेखील नियंत्रणात राहतो


तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास तुम्ही भाजलेले चणे नक्कीच ट्राय करु शकता. पण जर तुमचं वजन कमी असेल तर भाजलेले चणे प्रमाणातच खा


तुम्ही फिल्ड जॉब करत असाल किंवा खेळाडू असाल तर आहारात मोड आलेले चणे खाणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे


पण जर तुमची शारीरिक हालचाल कमी असेल किंवा बैठे काम असेल अशावेळी मोड आलेले चणे पचण थोडं जड जाते


तुम्ही दिवसभर ऑफिसात बसून काम करत असाल किंवा बैठे काम असेल तर अशावेळी उडकलेले चणे तुमच्या डायएमध्ये सामील करा


उकडलेले चणे शुद्ध तुपात हलके भाजून घ्या आणि त्यात थोडा लिंबाचा रस टाका. याप्रकार चणे खाल्ल्यास शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते

VIEW ALL

Read Next Story