तांदळामध्ये मुबलक प्रमाणात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात जे त्वचेतील कोलेजन वाढवून चेहरा उजळण्यास मदत करतात.
तांदळाच्या पिठापासून बनवलेला फेस पॅक त्वचेवरील डाग, पिगमेंटेशन, मुरूम यांसारख्या त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर ठरते.
तांदळाचा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे दही आणि 1 चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुवा.
तांदळाचे पीठ हळूवारपणे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते.
तेलकट त्वचा असलेल्यांसाठी तांदळाचा फेस पॅक जादू सारखे काम करते. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढूनस टाकण्यास मदत करते.
संवेदनशील त्वचेसाठी तांदळाचे पीठ उत्तम काम करते. चेहऱ्यावरील लालसरपणा आणि सूज कमी करून त्वचा मऊ बनवते.
तांदळाच्या पीठाचा फेस पॅक त्वचेच्या आतील ओलावा कमी करून चेहऱ्यावरची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.
अँटीऑक्सीडंट आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेलं तांदळाचं पीठ मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)