कच्च्या पपईमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
तसेच कच्च्या पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे तसेच अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म आढळतात.
बऱ्याचदा कच्ची पपई खायला अनेकांना आवडत नाही.परंतु कच्ची पपई खाण्याचे उपयोग आपण जाणून घेणार आहोत.
सामान्यत: कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन E आणि K (पोटॅशियम) असते. या जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कच्ची पपई खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास आपल्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळी पपई खाणे फायदेशीर ठरते.
हिरव्या पपईमध्ये पपीन नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक गुणधर्म असते. तसेच शरीराची ताकद वाढवण्यासही मदत यामुळे मदत होते.
कच्च्या पपईमध्ये फायबर, पोटॅशियम आणि फोलेट असते,जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
शिवाय आणि कच्च्या पपईचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका ही कमी होऊ शकतो.