थंडीच्या दिवसात हिरवा वाटाणा बाजारात खुप येतो. पण फ्रोजेन आणि ड्राय फॉर्ममध्ये ते तुम्हाला वर्षभर मिळतील. मात्र फ्रोजन वाटाणे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ताजा हिरवा वाटाणा म्हणजेच मटर खाण्याचा सल्ला दिला जातो. थंडीत हिरवा वाटाणा खाण्याचे नक्की काय फायदे होतात ते जाणून घ्या
हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. त्यातच हिवाळ्यात हिरव्या वाटाण्यांना बाजारात जास्त मागणी असते.
हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट यासारख्या पोषक घटकांचा समावेश असतो.
हिरव्या वाटाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. ते खाल्ल्याने खुप वेळ पोट भरल्यासारखे राहते. अशातच तुम्ही अतिरिक्त जेवण खाण्यापासून दूर राहता.
हिरवा वाटाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे ते दररोज खाल्ल्याने हाड आणि स्नायू मजबूत होतात. त्याचसोबत मसल्स रिपेयर करण्यासही मदत होते. मुलांच्या शरीराच्या विकासासाठी हे फार फायदेशीर ठरू शकते.
हिरव्या वाटण्यात ग्लाइसिमिक इंडेक्स फार कमी असते. त्यामुळे ब्लड शुगरचा स्तर रेग्युलेट होण्यास मदत होते. त्याचसोबत अचानक शरीरात वाढणारी शुगर यामुळे कंट्रोल होते.
हिरव्या वाटाण्यात असे काही मिनिरल्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम ही असतात. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका फार कमी होतो.