लांब सडक आणि सुंदर केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. केसांची निगा राखण्यासाठी तेल महत्वाचे आहे.
केस गळणे, लवकर पांढरे होणे, टक्कल पडणे आणि कोरडे व निर्जीव होणे अशा अनेक समस्यांवर तेल मजास हा सर्वोत्तम उपाय आहे.
अनेकजण खोबरेल तेलने मसाज करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. खोबरेल तेलाने कोंड्याची समस्याही दूर होते.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. यामुळे केस घट्ट आणि मजबूत होतात.
ऑलिव्ह ऑईल मध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या देखील दूर होते.
जोजोबा तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होतात.
ऑनियन ऑईल हे केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय मानले जाते.