धार्मिक कार्याव्यतिरिक्त भीमसेनी कापूरला आयुर्वेदात बहुगुणी मानलं जातं.
चांगली झोप ही शरीरासाठी आरोग्यकारक आहे. रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने थकवा, चिडचिड होणं हा त्रास जाणवतो.
बऱ्याचदा मानसिक ताण तणावामुळे निद्रानाश होण्याची समस्या निर्माण होते.
रात्रीची झोप येत नसेल तर तुमच्या उशीखाली भीमसेनी कापूरची वडी ठेऊन झोपावं यामुळे नकारात्मक विचार दूर होतात.
झोपण्यापूर्वी तुमच्या बेडरुममध्ये कापूर जाळल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री शांत झोप
कापूरमध्ये असलेले घटक हवा शुद्ध करण्याबरोबरच शांत झोप लागण्यास मदत करतात.
त्याशिवाय सर्दी खोकल्यावर देखील कापूर गुणकारी मानला जातो.
गरम पाण्यात कापूरची पूड टाकून वाफ घेतल्याने सर्दी खोकल्यावर आराम पडतो.
भीमसेनी कापूर जास्त प्रमाणात ऑस्किजनचा पुरवठा करतं, त्यामुळे जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कापूरचा वास घेणं हा रामबाण उपाय आहे.
जर तुम्हाला मुळव्याधीचा त्रास होत असेल तर,खोबरेल तेलात कापूर तेलाचे दोन थेंब टाकून जखम झालेल्या जागी मालिश केल्याने फायदेशीर ठरतं.