तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रात्रीच्या वेळातील काही सवयी तुम्हाला कायमच्या सोडाव्या लागतील. या सवयी कोणत्या हे पाहूयात...
झोपण्याच्या आधी गरम दूध पिणं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतं. कारण गरम दुधामुळे शरीरामधील कॅलरीचं प्रमाण वाढतं.
शरीरामधील कॅलरी वाढल्याने पोटाचा घेर आणि स्थूलपणा कमी होत नाही.
त्यामुळेच रात्री गरम दूध पीत असाल तर तुम्हाला तुमचा डाएट मॅनेज करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला कॅलरी नियंत्रणात ठेवता येतील.
झोपण्याआधी तुम्ही मोबाईल स्क्रोअल करत बराच वेळ पडला असेल तर याचाही तुमच्या वजनावर परिणाम होतो.
रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने झोप पूर्ण होत नाही आणि शरीरामधील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं.
हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने शरीरामधील मेटाबायोलिझम मंदावतं. मेटाबायोलिझम मंदावल्याने वजन वाढतं.
चहा आणि कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण असतं. एका अभ्यासानुसार चहा किंवा कॉफीचं सेवन आणि झोपेमध्ये किमान 6 तासांचं अंतर हवं.
कॅफेनचं सेवन आणि झोपेमध्ये 6 तासांपेक्षा कमी अंतर असेल तर चांगली झोप लागत नाही आणि त्याचा परिणाम वजनावर होतो.
हार्डवर्ड हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार झोप पूर्ण झाली नाही तर हार्मोन्सचं संतुलन बिघडते.
हार्मोन्सचं संतुलन बिघडल्याने शरीराचं वजन वाढतं आणि स्थूलपणाचा समस्या निर्माण होते.
रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहत बसणेही चुकीचे आहे. टीव्ही पाहता पाहता स्नॅक्स खाण्याची सवय लागते.
झोपण्यापूर्वी टीव्ही पाहताना स्नॅक्स खाल्ल्याची सवय जडल्यास वजन वेगाने वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढतं.
झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण केलं पाहिजे असं सांगितलं जातं.
या पाचपैकी अनेक गोष्टी आपल्यातील अनेकजण नक्कीच करत असणार. पण या गोष्टींचा वजनावर परिणाम होतो हे अनेकांना ठाऊक नसतं.