अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. चिया सीड्समध्ये हेल्दी फॅट्स असतात. (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि एएलएचे प्रमाण जास्त असते. या सर्व पोषक घटकांचा संबंध हाडं मजबुत होण्यासाठी महत्त्वाचा आहे.
चिया सीड्स आकारानं लहाण असल्या तरी त्या अत्यंत पौष्टिक असतात. ते फायबर, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि विविध पोषक घटकांनी भरलेले आहेत.
चिया सीड्समध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अन्न पचनास मदत होते. त्याचसोबत लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त जेवण करणार नाही आणि वजन वाढणार नाही.
शरीरातील सूज कमी करण्यासाठी चिया सीड्स काम करतात. त्यासोबत इतर काही आजार होण्याची शक्यता देखील कमी होते.
चिया सीड्स खाल्यानं हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कारण त्यात असलेलं ओमेगा -3 फॅटी अॅसिड्स रक्तदाब सामान्य करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
कोविड-19 साथीच्या आजारापासून, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिली जात आहे. जेणेकरूण संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.